महाविकास आघाडीकडूुन काँग्रेस पक्षनेते राजाभाऊ ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
राजा भाऊ ठाकूर स्व. मा. आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजिव

प्रतिनिधी – नरेश पाटील ( माणगांव ) आज श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस आय पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मा. राजाभाऊ ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी राजा भाऊ ठाकूर यांनी श्रीवर्धन बाजारपेठेतून शक्ती प्रदर्शन करीत ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत जिपमधून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्यातील पदाधिकारी तसेच हिंदु – मुस्लिम महिला वर्ग तसेच तरुण वर्ग राजाभाऊना पाठींबा देण्यासाठी उपस्थित होता. दरम्यान राजा भाऊ ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून निवडणुक ल काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर उर्फे राजाभाऊ ठाकूर हे गेली २० वर्षाहून अधिक काळ राजकारणात सक्रीय आहेत. स्वर्गीय माजी आ. मधुकर ठाकूर यांच्याकडून त्यांना राजकीय धडे मिळाले आहेत. राजाभाऊ ठाकूर यांना अलिबागमध्ये आपला माणुस म्हणून ओळखले जाते. त्यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सामाजिक कामे केली आहेत. अलिबाग – रेवस हा रस्ता खड्डेमय झालेला होता रस्त्यांच्या दुरावस्थचे ग्रहण लागले होते आणि अलिबागसारख्या तालुक्यात दिग्गज नेते असताना कोणत्याही नेत्यांने या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, जनता प्रचंड संतप्त झाली होती. सर्व प्रकारचे कर सरकारला देवून रस्त्यांच्या या दुरावस्थेने जनतेमध्ये मोठा रोष निमाण झाला होता. जनतेला कोण वाली नाही अशी परिस्थीती उद्भवली होती. शासनाकडे सर्व राजकीय पक्ष, नागरिक,सामाजीक कार्यकर्ते, रिक्षा निमीडोअर चालक, वाहन चालक यांनी अनेक विनंती अर्ज केले परंतु काहीच कार्यवाही होत नाही हे पाहून सामाजिक बांधीलकी जपत सदर रस्ता स्वखर्चाने त्यांनी बनवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला होता. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात देखील त्यांना संधी मिळाल्यास ते संधी सोनं करित श्रीवर्धन मतदार संघाचा देखील कायापालट करतील यात शंका नाही.
राजाभाऊ ठाकूर यांना मध्य प्रदेशच्या निवडणूकीत निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. त्याचनुसार विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजाभाऊ ठाकूर यांची समनव्यक म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे. राजाभाऊ यांनी केलेल्या नियोजनबध्द कामामुळे तसेच पक्षाच्या जोरदार मागणीमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघातून महाविकास आघाडी कडुन काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेन्द्र मधुकर ठाकूर ऊर्फ राजा भाऊ यांनी आज उप विभागीय दांडाधिकरी श्री. महेश पाटील यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी त्यांच्या सोबत बहीण सौ. मनीषा पाटील, माणगाव ता. काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, विधीतज्ञ अरुण सावंत, माजी रा. जि. प सदस्य रवींद्र ठाकूर उपस्थित होते.