असंख्य मराठी मुस्लिम मनसैनिकांच्या उपस्थितीत फैझल पोपेरे दाखल करणार उमेदवारी अर्ज

गोरेगांव – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित झाले आहेत. सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यामध्ये मनसे कडून श्रीवर्धन मतदार संघातून नांदवी येथील मनसेचे महाराष्ट्र वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष फैझल अजिज पोपेरे यांचे नांव निश्चित करण्यात आले आहे.
नांदवी सारख्या छोट्याश्या गांवात जन्माला आलेले फैझल पोपेरे यांचे १० पर्यंतचे शिक्षण वनी पुरार येथे झाले असून पुढील शिक्षण गोरेगांव येथे झाले त्यानंतर बाहेरगांवी जाऊन जॉब करीत होते. परंतु ९ वीला असताना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणांवर आणि त्यांच्यावर प्रभावित होते त्यामुळे बाहेर गांवाहुन परत येत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र राज्य वाहतुक सेना उपाध्यक्ष पदा पर्यंतच्या प्रवासात त्यांनी अनेक समाजातील घटकांना न्याय देण्याचा काम केला आहे. मराठी माणसांसोबतच हिंदु -मुस्लिम एकोपा रहावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच कामाची दखल घेत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उद्या विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपआपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या पार्श्वमुमीवर उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्र वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष मा. फैझलभाई पोपेरे हे असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपल्या विधानसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.