महेश बालदी यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध ; पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांचा दृढ निश्चय.
भाजपने विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेत नाराजी.

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी जोरात सुरु आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले असून उरण विधानसभा मतदार संघातही विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वरिष्ठाच्या आदेशाने कामाला लागले आहेत. उरण विधानसभा मतदार संघात आगामी होणाऱ्या निवडणुका संदर्भात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाची भूमिका काय आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे. पदाधिकारी कार्यकर्ते यांची भूमिका काय आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावे आदी विषया संदर्भात शिवसेना शिंदे गटा तर्फे रविवार दिनांक २७/१०/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नेश्वरी मंदिर सभागृह, जसखार, तालुका उरण येथे पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पक्षाची भूमिका जाहिर करताना शिवसेना जिल्हा प्रमुख अतुलशेठ भगत यांनी भाजपने उमेदवारी जाहीर करताना शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने शिवसैनिक नाराज असून महेश बालदी यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध आहे असे सांगितले व निवडणुकीत महेश बालदी यांचे काम करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.