Join WhatsApp Group
सामाजिक

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा तर्फे वसुबारस निमित्त गोपूजन.

 प्रतिनिधी - संतोष उध्दरकर ( म्हसळा )

म्हसळा –आश्विन वद्य द्वादशी अर्था‌त वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात. त्यामुळे यंदा प्रथमच म्हसळा शहरात दिवाळीचा पहिला दिवस गाय वासराच्या पूजनाने साजरा करण्यात आला. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला असलेले महत्त्व लक्षात घेऊन आज सोमवारी हा दिवस पारंपरिक पध्दतीने साजरा केला गेला.  गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे संध्याकाळी शहरातील श्री गणेश मंदिरासमोर गाय वासरांची पूजा करण्यात आली. गोरक्षक बाबू बनकर, प्रसन्ना निजामपूरकर, शैलू पटेल, नगरसेविका राखी करंबे, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, श्रीमती सुलभा करडे आणि श्रीमती शैला करडे या मान्यवरांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले.

यावेळी शहरातील महिलांनी देखील पूजन केले, सुवासिनिंनी गाईला हळद कुंकू लावून औक्षण केले. त्याचप्रमाणे उमरोठकर गुरुजी यांनी वसुबारसचे महत्व लोकांना सांगितले व बाबू बनकर यांनी तालुक्यामध्ये गोरक्षणाचे अभियान बळकट करण्याचे आवाहन सुद्धा ह्यावेळी केले. महिलांनी गुळ, दाळ, पुरण पोळी, उडदाचे वडे गाईंला नैवेद्य स्वरूपात खाऊ घातले. सजविलेली गाय आणि वासरू, पारंपरिक पेहरावातील सुवासिनींनी केलेले पूजन आणि औक्षण.. ‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ असे म्हणत बाळगोपाळांनी केलेली ओवाळणी.. अशा प्रसन्न वातावरणात सवत्सधेनूचे पूजन करून झगमगत्या दीपोत्सवास आज सोमवारी प्रारंभ झाला. राहुल पोतदार, निलेश करडे आणि सुजित वेदक यांनी गाई वासरूला आणण्यासाठी परिश्रम घेतले.

या गोपूजनाचे आयोजन गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष सचिन करडे यांनी केले होते. यावेळी त्यांच्यासह तुषार करडे, श्रेया करडे, स्नेहल निजामपूरकर, स्वप्नील चांदोरकर, संतोष उद्धरकर, मोनिका कांबळे, अजय करंबे, कौस्तुभ करडे, सुषमा चांदोरकर, नेहा करडे, शरद चव्हाण हे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये