रेवदंडा, चौल, थेरोंडा दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे समाजश्रेष्ठी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे (नाना) यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.
प्रतिनिधी - ओमकार नागावकर (अलिबाग)

रेवदंडा, चौल, थेरोंडा दैवज्ञ ब्राह्मण सोनार समाजातर्फे समाजश्रेष्ठी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे (नाना) यांची पुण्यतिथी, दि.३१ जुलै रोजी साजरी करण्यात आली. अध्यक्ष देवानंद पोवळे यांच्या अध्यक्षतेखाली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व समाज उन्नतीचे विवीध उपक्रम करण्याचे योजिले आहे. यावेळी दैवज्ञ ब्राह्मण सोनार ज्ञाती भगिनी स्वाती जोमराज, अंजली घोसाळकर, मनीषा जोमराज, प्राची जोमराज यांनी समाजश्रेष्ठी जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे यांच्या शिक्षणक्षेत्र, सार्वजनिक नागरी सुविधा ख्यातीन विषयी भाषण करण्यात आले.
समाजश्रेष्ठी जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे यांचा जन्म १० फेब्रुवारी, इ.स. १८०३ रोजी मुंबई जवळील मुरबाड येथे झाला. मुंबईत दैवज्ञ ब्राह्मण सोनार व्यापारी व सावकारी कुटूंबात जन्म झाला असून पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली.मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या जमिनी सरकारला दिल्या. नानांनी मुलींच्या कन्याशाळेसाठी डॉ. विल्सन यांना स्वतःचा वाडा दिला, स्त्री शिक्षणाला चालना मिळावी यासाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वखर्चाने आपल्या वाड्यात घेतला. असे अनेक समाज एकत्रीचे कार्यक्रम समाजश्रेष्ठी जगन्नाथ शंकरशेठ यांनी केले. तोच वारसा पुढे चालवत रेवदंडा, चौल, थेरोंडा दैवज्ञ ब्राह्मण ज्ञाती बांधव व भगिनी वेगवेगळे उपक्रम राबवत असताना समाजाचा विकास करतील असे सांगण्यात आले.
यावेळी उत्सव कमिटी अध्यक्ष देवानंद पोवळे, उपाध्यक्ष अरुण तळेकर, खजिनदार नितेश पोवळे, सेक्रेटरी ओमकार नागावकर, महीला कमिटी अध्यक्षा स्वाती जोमराज, उपाध्यक्षा दिशा पोवळे, खजिनदार ज्योत्स्ना घोसाळकर व सदस्य उपस्थित होत्या. तसेच ट्रस्टी कमिटी अध्यक्ष दिपक तळेकर, खजिनदार शेखर पिसाट, सेक्रटरी प्रशांत जोमराज व सदस्य देखील उपस्थित होते.