ओएनजीसी उरण प्लांटच्या वतीने दि. १३ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन.
प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – रक्तदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने व गोरगरिबांना वेळेत रक्ताची उपलब्धता व्हावी या अनुषंगाने ओएनजीसी उरण प्लांट पुरस्कृत आणि ओएनजीसी स्थानीय लोकाधिकार समिती व ओएनजीसी (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी ओएनजीसी ए पी यु मेन गेट, द्रोणागिरी भवन, उरण येथे सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे होणाऱ्या यावर्षी रक्तदान शिबिराचे ३६ वे वर्ष असून, मागील वर्षी दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या रक्तदान शिबीरात एका दिवसात तब्बल ‘९४८ युनिट ‘ विक्रमी रक्तदान संकलन केले होते.
या रक्तदान शिबीरात मुंबई व नवी मुंबई मधील नामांकित रुग्णालयातील रक्तपेढ्यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.या कार्यक्रमास उरण संयंत्राचे समूह महाव्यवस्थापक व संयंत्र व्यवस्थापक – श्री. डि. के. त्रिवेदी, मुख्य महाव्यवस्थापक ( उत्पादन ) आधारभूत सेवा – संदीप कुमार चांद, महाव्यवस्थापक प्रभारी मानव संसाधन – श्रीमती भावना आठवले मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन देशकार्याला हातभार लावावा. रक्त दात्यांनी रक्तदानाला येताना कोणतेही एक ओळखपत्र ( आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, काम करीत असलेल्या कंपनीचे ओळखपत्र ) सोबत आणावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी, रक्तदात्यांनी ओएनजीसी ( डब्ल्यू.ओ.यु. ) कर्मचारी संघटना, उरण प्लांटचे उपाध्यक्ष – मनोहर थळी -९९६९२२७९५०, सचिव – बाळकृष्ण काशिद – ९९६९२२७९५१ / ८१६९८३१५७५, सचिव – उज्जेश तुपे – ८२९१२८१६९७, ९७६४१६५४२७ यांच्याशी संपर्क साधावा.