ललित कला फाऊंडेशनकडून श्री रविप्रभा मित्र संस्था गुणीजन पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर ( म्हसळा )

म्हसळा – ललित कला फाऊंडेशन, ठाणे व म्हसळा टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा येथे न्यु इंग्लिश स्कुल, म्हसळा या सभागृहात गजल व काव्य संमेलन दि. १४ व १५ डिसे. रोजी आयोजित करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी समीक्षक गजलकार रोहिदास पोटे तसेच या फाऊंडेशचे अध्यक्ष दिलीप कारखानीस यांच्या सह ठाणे, पनवेल, जालना, चिपळूण, पालघर, महाड, इंदापुर, व श्रीवर्धन येथुन अनेक साहितिक, गलजकार, कवी, लेखक, शायर, पत्रकार, समाजसेवक, संस्थापक, शिव व्याख्याते उपस्थित होते.
अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन काही मान्यवरांना गुणीजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या मध्ये श्री रविप्रभा मित्र संस्था, रायगड ही संस्था शिक्षण, आरोग्य, सामाजिक या विषयावर संपूर्ण रायगड मध्ये उत्तम काम करीत असल्याने या फाऊंडेशनच्या वतीने श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड या संस्थेला समीक्षक गजलकार रोहिदास पोटे व फाऊंडेशचे अध्यक्ष दिलीप कारखानिस यांच्या तसेच म्हसळा टाईम्सचे रमेश पोटले यांच्या हस्ते गुणीजन पुरस्कार देऊन सन्मानित आले. हा पुरस्कार स्विकारतांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लाड व त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी श्री रविप्रभा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना सांगितले कि ही आम्ही चांगले काम केल्याची पोच पावती आहे, हा पुरस्कार मिळाल्याने आता आमची अधिक जबाबदारी वाढली आहे. या कार्यक्रमात उपस्थित फाऊंडेशन चे अध्यक्ष दिलीप कारखानिस, समीक्षक गजलकार रोहिदास पोटे, म्हसळा टाईम्सचे रमेश पोटले, तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शितल मालुसरे, साहितिक गजलकार व्यकंटेश कुलकर्णी, रविप्रभा संस्थेचे संस्थापक रविंद्र लाड, शिव व्याख्याते सचिन करडे, कवियत्री अनिता कांबळे, लेखक, कवी, ललित ईंगळे, भिवराव सुर्यतळ, जाकिर अहमद, सोमनाथ सोनावणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.