Join WhatsApp Group
राजकीय

श्रीवर्धन मतदार संघातील उमेदवारांचा विजय निश्चित करणार लाडक्या बहिणीच

श्रीवर्धन मध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त असल्याने लाडक्या बहिणीच भावांचा विजय निश्चित करणार आहेत. त्यामुळे या मतदार संघात उमेदवारी करणाऱ्या भावांना लाडक्या बहिणींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणुकी पूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू करुन माहेरचा आहेर म्हणून महिना १५०० रुपये भाऊबीज भेट अशी ओवाळणी दिली आहे. त्या बदल्यात बहिणी उमेदवारांना आपले मतदान करुन अनोखी भेट देणार का याकडे  सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या श्रीवर्धन १९३ विधानसभा मतदारसंघात महिलांची मतदार संख्या १ लाख ३४ हजार ४८५ इतकी आहे तर पुरुष मतदार १ लाख २९ हजार ४३६ आहे. तब्बल २० हजार ४९ इतक्या महिला मतदार जास्त आहेत. त्यामुळे या मतदार संघातील लाडक्या बहिणीच कोणाला विजयी करायचे ते ठरवतील हे निश्चित आहे. २०१९ मध्ये एकूण ६५ टक्के मतदान झाले होते. २०२४ ला या मतदार संघात आणखी महिला आणि पुरुष मतदार वाढणार आहेत. अंतिम सुधारित मतदार यादी अद्ययावत होणे बाकी असून त्या लवकरच प्रदर्शित आणि प्रसिद्ध करण्यात येणार आहेत असे निवडणूक कार्यक्रम कार्यालयाने सांगितले आहे.

२०१९ मध्ये झालेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती सुनील तटकरे यांना ९१,६५० इतकी मते मिळाली होती तर शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना ५२,३४२ मते मिळाली होती. इतर उमेदवारां पेक्षा सर्वाधिक ३,७६५ इतकी मते नोटाला मिळाली होती. या विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरे या ३९,३०८ इतक्या फरकाने विजयी झाल्या होत्या. आता २०१९ ते २०२४ या पाच वर्षांमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी केंद सरकारच्या योजना, नामदार आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी राज्य सरकारच्या विविध योजना राबवित पदाचा भरपूर वापर करून माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा या पाचही तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करुन मार्गी लावली आहेत. तसेच त्यांच्या महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आल्याने आदिती तटकरे यांच्या बद्दल लाडक्या बहिणींचे विशेष प्रेम व्यक्त होताना दिसत असून त्यांच्यावर विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत.

आदिती तटकरे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकमेव कॅबिनेट मंत्री म्हणून महिला सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे केवळ श्रीवर्धन किंवा रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणी आणि महिलांना लाभ मिळत आहे. मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण हा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्यांचा सन्मान वाढविला आहे. त्यामुळे नवं मतदार तरुणी आणि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कॉलेज तरुणी महायुतीच्या उमेदवारांना आणि या मतदारसंघातील आदिती तटकरे यांना मतदान करतील असे दिसून येत आहे.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये