
माणगांव – माणगांव येथील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शिपुरकर आणि वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी कुमार साईराज भोसीकर याने जिल्हा स्तरावर तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
बुधवार दिनांक २३ऑक्टोबर रोजी एच. ओ. सी. एल. शाळा रसायनी, पनवेल येथे झालेल्या जिल्हा पातळीवरील शालेय तायक्वांडो स्पर्धेत साईराज भोसीकर याने ८७ किलोवरील वजनी गटात रौप्य पदक पटकावले. त्यामुळे त्याची निवड कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. साईराज भोसीकर यांस क्रीडा शिक्षक प्रतिक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
साईराज भोसीकर यांचे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, अरुण पवार, मुख्याध्यापिका मनिषा मोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.