जिल्ह्यात सार्थक म्हामुणकर याचा आर्चरी मध्ये प्रथम क्रमांक
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगाव – माणगाव येथील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गणेश यशवंत वाघरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी सार्थक म्हामुणकर याने दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२४ रोजी रसायनी, पनवेल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आयोजित शालेय जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल माणगाव चा इयत्ता ६ वी चा विद्यार्थी कुमार सार्थक म्हामुणकर याने इंडियन राऊंड १४ वर्षाच्या आतील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर त्याची कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पनवेल येथे होणाऱ्या शालेय विभागीय आर्चरी स्पर्धेकरीता त्याची निवड झाली आहे.
सार्थकने हे उज्वल मिळविल्याने अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, अरुण पवार, मुख्याध्यापिका सौ. मनीषा स्वप्नील मोरे क्रीडा शिक्षक प्रतिक संजय गायकवाड आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.