Join WhatsApp Group
राजकीय

२००७ सेझ आंदोलन प्रकरणात मनोहर भोईर यांच्यासह अटक असलेल्या ७ ही जणांची जामिनावर सुटका

बेलापूर न्यायालयाने केले जामिन मंजूर

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) २००७ च्या सेझ विरोधी आंदोलन प्रकरणी उरणचे माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्यासह शिवसेनेच्या ७ कार्यकर्त्यांना बुधवारी अटक करुन त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यावर १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी बेलापूर न्यायालयाने त्यांना जमिन मंजूर केला आहे.

उरण, पनवेल व पेण तालुक्यातील ४५ महसूली गावातील ३० हजार एकर शेतकऱ्यांच्या जमिनी एस ई झेड प्रकल्पासाठी तत्कालिन सरकारने सक्तीने भुसंपादन केल्या होत्या. या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह शिवसेनेचाही प्रखर विरोध होता. त्यामुळे हा एस ई झेड विरोधात शिवसेनेने राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा सेझ प्रकल्प हटाव या मागणीसाठी कोकणभवन येथील कोकण आयुक्त कार्यालयावर १६ ऑगस्ट २००७ रोजी आंदोलन केले होते.

यामध्ये आंदोलनात अनेक वाहनांची तोडफोड झाली होती. या संदर्भात सिबीडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोप या आंदोलकांवर ठेवण्यात आला होता. तब्बल १७ वर्षे न्यायालयात सुनावणी सुरु होती. या सुनावणीला वारंवार समन्स देऊनही गैरहजर राहत असल्याने संबंधिताना १६ ऑक्टोबर रोजी वारंट काढण्यात आले होते. या प्रकरणी ७ जणांना बेलापूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांना १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी बेलापूर न्यायालयाने जमीन मंजूर केला असून तळोजा कारागृहातून संबंधितांची सायंकाळी सुटका करण्यात आली आहे त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

उरणचे माजी मनोहर भोईर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, तालूका प्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, रामचंद्र देवरे, पद्माकर तांडेल व गुरुनाथ पाटील यांना अटक झाल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले होते. त्यामुळे ही बातमी समजताच शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, संपर्क प्रमुख महादेव घरत, संघटक बी. एन. डाकी, दिपक भोईर, रुपेश पाटील, महेश वर्तक यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेलापूर येथे गर्दी केली होती.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये