रायगड टॅलेन्ट सर्च (RTS)या स्पर्धा परीक्षेस जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद.
प्रतिनिधी - किशोर पितळे ( तळा )

शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय पूनिता गुरव मॅडम यांच्या संक्लपनेतून रायगड टॅलेंट सर्च हे जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते साठी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. या उदात्त हेतूने १ एप्रिल २०२४ रोजी RTS रायगड टॅलेंट सर्च हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. RTS या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातून ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केले होते.
आज शनिवार , दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी पेपर क्रमांक०१ रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आला. १५ पैकी १४ तालुक्यांमध्ये ६२ केंद्रावर २८५४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. तळा तालुक्यातून तळा, तळेगाव, मजगाव व पिटसई या ४ केंद्रातून १४७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला. या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केंद्र संचालक, पर्यवेक्षक म्हणून प्रत्येक केंद्रावर उत्तमरित्या काम करून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी खूप मोलाचे योगदान दिले.
परीक्षा केंद्रावर प्रथम तीन क्रमांक
परीक्षा केंद्र – १ रा.जि.प. तळे मराठी (तळा)
मानवी लालसिंग पावरा – आनंदवाडी श्लोक दीपक तुपे – तळे मराठी. आरुषी शांताराम बोडखे – तळे मराठी अनन्या निलेश फुलारे – तळे मराठी
परीक्षा केंद्र – २ रा.जि.प. तळेगाव (तळेगाव)
मानसी प्रकाश दुरे – गायमुख चैताली नामदेवमहाडिक – चरई खुर्द सोनम संदेश शेडगे – तळेगाव
परीक्षा केंद्र – ३ रा.जि.प. वाशी हवेली (मजगाव)
स्वराज जगन्नाथ तांडेल – वाशी हवेली आरुष महेश पाखर – ताम्हाणे आरोही धनंजय वतारी – वरळ
परीक्षा केंद्र – ४ अ. ल. लोखंडे हायस्कूल पिटसई (पिटसई)
आहान चंद्रकांत जगताप – पिटसई अर्पिता चेतन कातुर्डे – शेनाटे वृत्ती विशाल जगताप – रहाटाड
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी व मुलांनी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळविण्यासाठी RTS ही संकल्पना गावागावात पोहोचणे गरजेचे आहे.यासाठी रत्नाकर पाटील सर, सर्व जिल्हा, तालुका, केंद्र कमिटी शिक्षकांचे खूप मोलाचे सहकार्य लाभत आहे