तळा ग्रामीण रुग्णालय येत्या आठ दिवसात सुरू होणार; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांचे लेखी आश्वासन.
प्रतिनिधी - किशोर पितळे ( तळा )

तळा – तालुका विकास आघाडीने तळा ग्रामीण रुग्णालय सुरू करण्या संदर्भामध्ये घेतलेला पवित्रा आणि आरोग्य केंद्राचे दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणाऱ्या वर्षश्राद्ध आंदोलनाची निवेदन ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले होते या निवेदनाची दखल ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांनी येत्या आठ दिवसात चालु करण्याचे आश्वासन दिले आहे.
गेली दोन वर्षे तळा ग्रामीण रुग्णालय बंद अवस्थेत होते ते चालु करण्याकरिता तळा विकास आघाडीचे संस्थापक पत्रकार विराज टिळक व सामाजिक कार्यकर्ते श्री. रामदास तळकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत या रुगणालयाचे ४ सप्टेंबर २०२४ रोजी वर्ष श्राद्ध घालण्याबाबत पत्रिका छापल्या होत्या
या पत्रिका शनिवार रविवार हे सुट्टीचे वार असल्याने प्रशासनकीय कार्यालयास देणं शक्य नव्हतं परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना मात्र ते वॉट्सअपने पाठवण्यात आले होते या पत्रिकेची गांभिर्याने आणि सकारात्मकपणे विचार करुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी अवघ्या १२ तासात दखल घेत सदर रुग्णालय येत्या आठ दिवसात चालु करणार असल्याचे पत्र देवून दि. ४ सप्टेंबर रोजी घालण्यात येणाऱ्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम हा तुर्तास थांबवुन मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. सोबतच या रुग्णालयात १० काॅट, इमर्जन्सी वार्ड, ३ वैद्यकीय अधिकारी, २ परिसेविका, २ अधिपरीचारीका, २ चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ५ आय सी यू बेड्स, एक्सरे मशीनरी, संगणक साहीत्य व वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाय वैद्यकीय अधिकारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती देखील मिळालेली आहे.
तळा विकास आघाडीने यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने दखल घेतली आहे. “गाव करील ते राव काय करील” या उक्तीप्रमाणे तळा विकास आघाडीने यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे तळा विकास आघाडीचे तळा तालुक्यात कौतुक होत आहे.