रेपोलीची कुमारी श्रुती शेडगे वक्तृत्व स्पर्धेत माणगांव तालुक्यात प्रथम तर निबंध स्पर्धेत द्वितीय.
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे )

चांदोरे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनवरणानिमित्त सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रा.जि.प शाळा रेपोली येथील विद्यार्थ्यींनीने वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेत शाळेचे नावलौकीक केले आहे.
रा. जि. प शाळा रेपोली ही शाळा गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असून अनेक गुणवंत विद्यार्थी या शाळेतून घडत आहेत याचेच उदा. श्रुती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनवरणानिमित्त सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा विषय होता अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सांगताना तीने अगदी थोड्या वेळेत महाराजांच्या कार्याबद्दल अंगावर काटा आणणाऱ्या शब्दात महाराजाबद्दल भाषण केले. या तिच्या यशामुळे तिचे व तिला मार्गदर्शन करणारे सुनिल गोरेगावकर सर यांचे तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. तांबट मॅडम , गोरेगावचे विस्तार अधिकारी खामकर सर , लोणेरे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय खैरे सर , केंद्र प्रमुख संजय पालांडे , केंद्रप्रमुख रविंद्र पालकर यांनी तिचे कौतुक केले तसेच लोणेरे केंद्रातील सर्व शिक्षक यांनीही दुरध्वनीच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले.
कुमारी श्रुती शेडगे व तिचे मार्गदर्शक श्री. सुनिल गोरेगांवकर सर यांचे शाळेचे मुख्याध्यापक महाले सर , जायभाये मॅडम तसेच तोरमल सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या स्वातीताई आवाद , अंगणवाडी सेविका भोईर मॅडम , रेश्माताई आवाद तसेच गाव विकास कमिटी अध्यक्ष व शाळाव्यावस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.