Join WhatsApp Group
आरोग्य व शिक्षण

रायगड टॅलेन्ट सर्च (RTS)या स्पर्धा परीक्षेस माणगाव तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी - पांडुरंग माने ( गोरेगांव)

          गोरेगाव : रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय पूनिता गुरव मॅडम यांच्या प्रेरणेतून शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी रायगड टॅलेंट सर्च RTS हे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सुरू करण्यात आलेले असून रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातून ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेले होते
शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी RTS चा पेपर क्रमांक ०१ रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आला. माणगाव तालुक्यातून गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तळाशेत, माणगाव आणि गोरेगाव या ३ परीक्षा केंद्रावर १४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग नोंदविला  होता.

निकाल पुढील प्रमाणे
परीक्षा केंद्र तळाशेत                                                    १) आयुष सुधीर निकम १८६ भूवन, २) श्रवण सुधीर गव्हाणे १६२ कोल्हाण ३) स्वरूप किरण बडेकर १४६ निवी ४) सई प्रदीप कासार १४४ तळाशेत ५) विहान विठोबा बारस्कर १३४ नगरोली

परीक्षा केंद्र माणगाव
१) सार्थक अंकुश जाधव २३६  पाणोसे कोंड २) प्रथमेश नरेश जाधव २१२ पाणोसे कोंड ३) स्वरा संतोष खानविलकर १८२ भाले ४) अवनी संदेश कदम १८० कोस्ते बुद्रुक ५) रुद्र रवींद्र बेंदुगडे १७४ सुरव तर्फे तळे ६) जुई सुरेंद्र नागोठकर १७४ उतेखोल वाडी

परीक्षा केंद्र गोरेगाव
१) अक्षरा वैभव सूर्यवंशी २६४ भिंताड २) आदित्य दादासाहेब निंबाळकर २१६ नागाव ३) निहान अर्जुन गावडे १९२ वडगाव कोंड ४) स्वरांजली धर्मराज चिकणे १६४ वडवली कोंड ५) ओम राजेश पानसरे १६४ वडगाव कोंड ६) काव्या परेश गायकवाड १६० वडवली कोंड

            या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षक मंगेश म्हस्के, कुमार उपरे, अमोल गुरव, अशोक मालवे, सुधा मोरे मॅडम, आनंद गायकवाड, संदीप साळवी, सुदर्शन वाघोरकर, वैभव सूर्यवंशी, प्रकाश खडसे, राज कडू, विशाखा डांगे, लतिका गोरेगावकर, नेहा जाधव केंद्र संचालक, पर्यवेक्षक म्हणून प्रत्येक केंद्रावर उत्तमरीत्या काम करून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी खूप मोलाचे योगदान दिले. मुकेश भोस्तेकर यांनी तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी व मुलांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळविण्यासाठी RTS ही संकल्पना गावागावात पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी श्री रत्नाकर पाटील सर, सर्व जिल्हा, तालुका, केंद्र कमिटी यांचे खूप मोलाचे योगदान आहे.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये