
प्रतिनिधी – किरण बांधणकर (पेण) पेण विधानसभा मतदार संघात भाजप सांस्कृतिक सेल तर्फे भजनामृत स्पर्धेचे आयोजन दिनांक ५, ६ व ७ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते, या स्पर्धेत ५८ भजन मंडळाने सहभाग जेऊन सुश्राव्य भजन, अभंग सादर केले
या स्पर्धेचे बक्षीस वितरण पंडित भीमसेन जोशी यांचे पट्ट शिष्य पंडित आनंद भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र पाटील,रायगड भाजपा लोकसभा प्रमुख सतीष धारप, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजपा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण तालुका सरचिटणीस, मिलिंद पाटील, रोहिणीताई धारप, नीलिमाताई पाटील हेमंत दांडेकर, श्रीकांत पाटील, डी बी पाटील, उदय काठे, सोपान जांभेकर, विश्वास जोशी, सिद्धेश जोशी, दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम स्पर्धेच्या परीक्षकांना सन्मान करण्यात आले यात निवृत्तीबुवा चौधरी, महावेवबुवा शाहाबाजकर, दत्तात्रय बुवा पाटील, संतोषबुवा पाटील,लांबे महाराज तसेच रायगड भाजपा लोकसभा प्रमुख सतीष धारप यांना माजी आमदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
खास बक्षीस वितरणासाठी उपस्थीत असलेले पंडित आनंद भाटे यांनी आपल्या वादक सहकाऱ्यांबरोबर प्रथम जय जय राम कृष्ण हरी हा अभंग सादर केला तसेच रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, मन राम चरणी रंगले, मन जाऊ कुणाला शरण अशा मधुर व बोधक अभंग भजनामृतातून भगवंताच्या सगुण रूपाचे व अस्तित्वाचे जणू दर्शन घडवून श्रोत्यांना भक्तिभावाच्या वातावरणात आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध केले.
अंतिम विजेते भजन मंडळ
१) स्वरगंध, पेण – प्रथम क्रमांक
२) श्री भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ माणगाव बु.- द्वितीय क्रमांक
३) पेण – दिवा मेमो प्रवासी भजन संघटना – तृतीय क्रमांक
४) श्रीराम प्रासादिक भजन मंडळ जांभूळटेप – चतुर्थ क्रमांक