भव्य श्रावणसरी नृत्य स्पर्धेत कर्नाळा महिला मंडळाने पटकावले प्रथम पारितोषिक
प्रतिनिधी - श्रीकांत नांदगावकर (तळा)

तळा – तळा शहरातील गणेश मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका व शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य श्रावणसरी नृत्य स्पर्धेत कर्नाळा महिला मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
पवित्र श्रावण महिन्यात महिलांतील सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तळा तालुका व तळा शहर यांच्या वतीने या भव्य श्रावणसरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेत एकूण १५ महिला पथकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रुपये १००००/- चे पारितोषिक कर्नाळा महिला मंडळ, द्वितीय क्रमांकाचे रु. ७०००/-चे पारितोषिक संतसेना महिला ग्रुप फोंडळवाडी तर तृतीय क्रमांकाचे ५०००/- चे पारितोषिक माऊली महिला ग्रुप खांबवली आदिवासी वाडी यांनी पटकावले आणि उत्तेजनार्थ असलेले पारितोषिक जानकी महिला मंडळ ग्रुप रोवले व भैरवनाथ महिला ग्रुप उसर यांनी पटकावले.
कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा जान्हवी शिंदे, माजी महिला व बाल कल्याण सभापती गीता जाधव, माजी सभापती अक्षरा कदम, शहर अध्यक्षा मेघा सुतार, शेणवली सरपंच निकिता गायकवाड यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.