Join WhatsApp Group
राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळी फित दाखवत निषेध; जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णु पाटील व पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात…

प्रतिनिधी - ओमकार नागांवकर (अलिबाग)

अलिबाग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आज महामार्गाची पहाणी करण्यासाठी पेण वाशी येथे आले असता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळ्या फिती दाखवत निषेध करण्यात आला त्यामुळे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णु पाटील व पदाधिकारी यांना पोयनाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

       गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखं समीकरण आहे. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो.  त्यामुळे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते आणि अवघ्या काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार आहे अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आज महामार्गाची पहाणी करण्याकरिता आले असताना  भाजपा-शिंदे सरकारला गेली सतरा वर्षे रखडलेला आणि रस्त्याची चाळण होऊन दुरावस्था झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आताच वेळ मिळाला का…? अजूनपर्यंत झोपून राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महामार्ग पाहणीच्या नौटंकीचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे आणि संपर्कप्रमुख आंदोलन सम्राट विष्णुभाई पाटील यांनी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळ्या फिती दाखवत निषेध आंदोलन केले.

 

            गणपतीला चाकरमानी पंधरा दिवस आधीच कोकणात पोहचतात. काही चाकरमानी दुरावस्था झालेल्या महामार्गावरून कोकणात गेलेही. पावसाळा सुरु झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. तेव्हा आधीपासून मुख्यमंत्र्यांनी महामार्गाची पहाणी का केली नाही…? आता रस्त्याची पाहणी करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कामावरून महायुतीत वाजले आहे…रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आल्याने मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी रस्त्यावर आल्याचा टोला उबाठा शिवसेनेने हाणला आहे. थोडे दिवस थांबा. निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावरच येणार आहेत. असेही उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

              यावेळी संपर्क प्रमुख विष्णु पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना वक्ते धनंजय गुरव, विभाग प्रमुख गिरीश शेळके, चंद्रहार पाटील व जिल्हा महिला संघटिका दिपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, जिल्हा समनवयक नरेश गावंड, पेण तालुका प्रमुख जगदिश ठाकूर, अलिबाग-पेण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये