भा.ज.पा. तालुका अध्यक्ष पदी डॅशिंग गोविंद कासार यांची निवड
प्रतिनिधी - आदित्य गोरेगांवकर ( गोरेगांव )

गोरेगांव – भा. ज. प नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांच्या निवासस्थानी काल दि. २५ ऑगस्ट रोजी निजामपुर येथील कट्टर हिंदुत्ववादी विचार बाळगणारे आणि तरुणांचे प्रेरणास्थान असणारे गोविंद कासार यांची भा.ज.प. च्या माणगांव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
भा. ज. प चे खासदार धैर्यशिल दादा पाटील यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली निजामपुर विभागातील निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेले, कट्टर हिंदुत्ववादी विचार बाळगणारे आणि तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थान असणारे गोविंद कासार यांची भा.ज.पा. माणगांव तालुका अध्यक्ष पदी मा. खासदार धैर्यशिल दादा पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यामुळे भा. ज. प कार्यकर्त्यांनी श्री. गोविंद कासार यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजेंद्र गाडे युवा सरचिटणीस माणगांव तालुका, बाबुराव चव्हाण माणगांव उपतालुकाध्यक्ष, विशाल पाशीकर निजामपूर शहराध्यक्ष, गणेश कासार निजामपूर माजी उपसरपंच, आनंद राजभर उत्तर भारतीय सेल माणगांव तालुका अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.