पथिक प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा
गोरेगांवातील गोरोबानगरच्या आगळ्या वेगळ्या मनोऱ्यांनी वेधले सर्वांचेच लक्ष

गोरेगांव – दरवर्षीप्रमाणे यंदाही पथिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाशभाई हरवंडकर यांनी दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. पथिक प्रतिष्ठानच्या या दहिहंडी महोत्सवामध्ये गोरेगांव मधील गोरोबानगर गोविंदा पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले पुरस्कृत पथिक प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या दहिहंडी उत्सवात फक्त गोरेगांवातील गोविंदा पथकांनी सहभाग घेतला नव्हता तर जिल्ह्यातील अनेक गोविंदा पथकांनी या दहिहंडी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला होता. पथिक प्रतिष्ठान कडून येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले तसेच पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच हजार, सहा थर लावणाऱ्या पथकाला सहा हजार तर सात थर लावणाऱ्या पथकाला सात हजार आणि मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले पुरस्कृत पथिक प्रतिष्ठान आयोजित आठ थरांची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला १००००१/- रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले होते. या एक लाख एक रुपयांच्या पारितोषिकाकरिता सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला आठव्या थराकरिता पात्र धरण्यात येणार होते त्यामुळे जिल्ह्याभरातून या पारितोषिकाकरिता आलेल्या गोविंदा पथकाकडून लावण्यात आलेल्या मानवी मनोऱ्यांचे चित्तथरारक कौशल्य सर्वांनाच अनुभवता आले. परंतु या सर्व गोविंदा पथकामध्ये सर्वाचे लक्ष वेधले ते गोरेगांव येथील गोरोबानगर मधील गोविंदा पथकाने
या गोविंदा पथकांनी मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच लव्ह जिहाद विरोधात वेगळ्या प्रकारे मनोरे रचुन सु़ंदर पद्धतीत सादरीकरण करुन एक सामाजिक संदेश देऊन जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष वेधले होते
त्यामुळे गोरोबानगरमधील या सर्व युवा मुला-मुलींच्या आणि ग्रामस्थांच्या सामाजिक संदेश देणाऱ्या संकल्पनेचे कौतुक होत आहे.