Join WhatsApp Group
संपादकीय

कार्यसम्राट मा. आ. भरतशेट गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावीत संत रोहिदास गर्जना मंडळाचा शिवसेना शिंदे गटात जाहिर प्रवेश

गोरेगांव  – कार्यसम्राट मा. आमदार भरत शेट गोगावले यांच्या प्रमुख उपस्थित गोरेगांवातील संत रोहिदास गर्जना मंडळाने शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

गोर- गरीबांचे कैवारी, दाता कार्यसम्राट मा. आमदार भरत शेट गोगावले यांनी अगणित ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. विकास कामांचा तडाखा लावत प्रत्येक माणसाची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्या अडचणींना उभे राहिले आहेत याच मा. आमदार भरतशेट गोगावलेंच्या कार्यप्रणालीवर प्रभावीत होऊन गोरेगांवातील संत रोहिदास गर्जना मंडळाच्या परिवाराने मा. आमदार भरतशेट गोगावले यांना पाठींबा देण्याचा निश्चय केला होता परंतु योग जुळून येत नव्हता मात्र काल दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी गोरेगांव विभाग प्रमुख श्री. दिनेशजी हरवंडकर यांच्या पुढाकाराने योग जुळून येत कार्यसम्राट मा. भरत शेट गोगावले यांच्या प्रमुख उपस्थित संत रोहिदास गर्जना ( रजि. ) मंडळाच्या  परिवाराने एकमताने  शिवसेना  शिंदे गटात प्रवेश केला आहे.

या वेळी  सौ. साक्षी प्रसाद गोरेगांवकर ( ग्रा. सदस्या, गोरेगांव ) यांची महिला गोरेगांव शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली प्रसंगी आमदार भरतशेट गोगावले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना  शुभेच्छा दिल्या असून लवकरच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा. भरतशेठ गोगावले यांचे महिलांकडून औक्षण करण्यात आले त्यानंतर मंडळाचे सल्लागार दिलीप गोरेगांवकर व मंगेश गोरेगांवकर यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले

सोबतच इतर उपस्थित मान्यवरांचे देखील मंडळाच्या तरुणांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर पक्षप्रवेश करण्यात आला.

प्रवेशानंतर कार्यसम्राट मा. आमदार भरतशेठ गोगावले यांनी गोरेगांवातील एकमेव छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासभोवतालचे लवकरच नुतणीकरणा सोबतच सुशोभिकरण करण्याचे आश्वासन संत रोहिदास गर्जना मंडळाच्या परिवाराला दिले.

याप्रसंगी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख सौ. निलिमाताई घोसाळकर, रायगड जिल्हा युवासेना प्रमुख विपुल उभारे, माणगांव उपतालुका प्रमुख जगदीश दोशी, गोरेगांव विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर, माणगांव महिला तालुका प्रमुख सौ. अरुणा वाघमारे, लोणेरे महिला विभाग प्रमुख सौ. अर्चना धसाडे, गोरेगांव उपशहर प्रमुख सज्जादभाई गोडमे, नागांव माजी सरपंच वामन बैकर, माणगांव तालुका सोशल मिडिया अध्यक्ष आदित्य गोरेगांवकर, नागांव ग्रा, सदस्य भुषण जाधव इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत रोहिदास गर्जना (रजि.) मंडळ नसुन एक परिवार आहे जे प्रत्येक निर्णय एकमेंकाच्या विचाराने घेत असतात तसेच  गेली अनेक वर्ष परंपरा जपत प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करीत आले आहेत. नागपंचमीला बाल्या नृत्याचे नारळ फोडून गणेशोत्सवाची चाहुल लागल्याचे संकेत याच मंडळाकडून दिले जातात….. पुढे नवरात्रौत्सवात महिला वर्गच नाही तर पुरुष, तरुण – तरुणी देखील मोठ्या प्रमाणात गरबा नृत्याचे आनंद घेतात………. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोनं ( आपट्याची पाने ) देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात…….. कोजागिरी पोर्णिमेला सर्वजण एकत्र येत नाचगाण्यासोबतच मसाला दुधाचा आनंद घेतात….. दिवाळीला याच मंडळानी बसविलेल्या गोरेगांवातील एकमेव छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याभोवती रांगोळी काढून महिला दिवे लावून महाराजांविषयी ऋण व्यक्त करत असतात….२६ जानेवारीला हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सत्य नारायणाची पुजा घालून त्या दिवशी सर्व महिला एकमेकांना तसेच येणाऱ्या सुहासिनींना वाण, तिळगुळ देत हळदकुंकू लावून महिला मंडळाकडून हळदी कुंकूवाचा उत्सव साजरा केला जातो… फेब्रुवारी महिन्यात होणारी संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंत्ती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते तसेच तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंत्ती देखील मोठ्या दिमाखात साजरी करतात….लहान मुलांकरिता विविध स्पर्धां सोबतच महिलांसाठी खास खेळ पैठणीच्या खेळाचे देखील आयोजन मंडळाच्या वतीने केले जाते……. संत रोहिदास गर्जना मंडळाचे प्रत्येक सदस्य नेहमीच सण उत्सव साजरे करण्यासाठी तसेच परंपरा जपण्यासाठी अग्रहीत असतात…

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये