शक्ती प्रदर्शन करीत अनिल नवगुणे यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज.
प्रतिनिधी - नरेश पाटील ( माणगांव )

श्रीवर्धन – विधान सभा निवडणु अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडी तर्फे १९३, श्रीवर्धन विधान सभा मतदार संघातून अनील नवगुणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी श्रीवर्धन शहारातून शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढण्यात आली. या रॅलीत हाजारोंच्या संख्येने युवक- युवती, महीला, महविकास आघाडीचे सर्व प्रमुख पक्ष, मित्र पक्षाच्या कार्यकर्ते हातात झेंडे, शरद पवार यांचा फोटो फलक, छातीवर बिल्ला, डोक्यावर टोपी घालून सामील झाले होते. रॅलीत शिवसेना पक्षाचे प्रसिध्द गाणेदेखील डिजे वर लावणयात आले होते. या वेळी उत्साहाचा वातावरणात ‘हम बी कूच कम नही.’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.
महाविकास आघाडीला निवडणुक आयोगाने श्रीवर्धन विधान सभा निवडणूकीसाठी तुतारी चिन्ह दिलेले आहे. या चिन्हावर राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाकडून अनिल नवगुणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी कालच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी श्रीवर्धन मध्ये रॅलीचे आयोजन केले होते. या रॅली दरम्यान त्यांनी जीपवर उभे राहुन उपस्थीतांना हात जोडून नमस्कार करत आशीर्वाद मागितला आहे. तसेच सोमजाई माता देवी मंदिरात जाऊन आई सोमजाई देवीचे दर्शन घेतले.
अनिल नवगुणे हे तुतारी चिन्हावर निवडणूक लडवत असल्याने श्रीवर्धन विधान सभा मतदार संघातील निवडणूक रंगतदार तसेच चुरशीची होणार असे बोलले जात आहे. अनिल नवगुणे हे राजकीय वर्तुळात लोकप्रिय, अत्यंत वजनदार तसेच राजकीय दांडगा अनुभव असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे या निवडणूकीत त्यांचा विजय हा निश्चित आशादायी बनला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगुणे यांनी अर्ज दाखल करताना त्यांचा सोबत माजी आमदार तुकाराम सुर्वे, श्रीवर्धन शिवसेना उध्दव बाळा साहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी अविनाश कोलंबेकर, अरुण शिगवण, अनिल पवार, शिवराज चापेकर, क्रीष्णा म्हात्रे यांच्यासह असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.