Join WhatsApp Group
आरोग्य व शिक्षण

न्हावा शेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद

प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – उरण  तालुक्यातील  पूर्व  विभागात अपघातात मृत्यू  पावलेल्या  प्रत्येक  व्यक्तीला  १०,००० रुपयाची  आर्थिक  मदत करणाऱ्या  व सी. एच .ए ( कस्टम हाऊस एजेंट ) च्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेने आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले असून सामाजिक बांधिलकी जपत दिनांक १/१२/२०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन, उरण येथे संस्थेतर्फे आयोजित केलेले भव्य दिव्य रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत चष्मे वाटप शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले. या शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.

या शिबिरात आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल तर्फे डॉ. ओमकार पाटील, डॉ. सुदेश पाटील, टेक्निशियन अक्षता पार्टे, नेहा कदम, कॅम्प कोओर्डीनेटर – विजय बामने, रुचिता पाटील आदींनी २०१ रुग्णांची नेत्र तपासणी केली. व अनेक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्र क्रिया देखील केली. तर पनवेल हॉस्पिटल (ओल्ड पनवेल )तर्फे डॉ. सुरेश करांडे, डॉ. आरती करांडे यांनी १०१ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत मार्गदर्शन केले. विविध रोगाचे निदान केले. तेरणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबईच्या तेरणा ब्लड बँकेचे टेक्निशियन केसरीनाथ भगत, नितीन पाटील, सोशल वर्कर दत्ता राठोड तसेच समर्पण ब्लड बँक घाटकोपरचे सिस्टर शिला वाघमारे, डॉ. देवांशी, राजेश सोळंकी, सामाजिक कार्यकर्ते सुनिल वर्तक यांनी तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करून रक्तदानासाठी महत्वाचे सहकार्य केले.यावेळी या शिबिरात एकूण दोन्ही ब्लड बँकेचे मिळून १३६ रक्त दात्यांनी रक्तदान केले. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा सी.एच.ए आधार सामाजिक संस्थेच्या सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्र क्रिया शिबीर, मोफत चष्मे वाटप शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला. चांगल्या उपक्रमांचे आयोजन केल्याने जनतेने या उपक्रमांचे कौतुक करत न्हावा शेवा सी.एच.ए आधार सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये