ललित कला फाऊंडेशन व म्हसळा टाईम्स संयुक्त विद्यमाने आयोजित काव्य गजल संमेलन
गजलप्रेमींसाठी मेजवानी ; म्हसळ्यात रंगणार गजल मैफिल...

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) ललित कला फाऊंडेशन ठाणे व दि म्हसळा टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ डिसेंबर व १५ डिसेंबर २०२४ वार शनिवार व रविवार या दोन दिवशी न्यु इंग्लिश स्कुल, म्हसळा यांच्या सभागृहात प्रथमच काव्य गजल संमेलन व महफिल – ए – सुखन गजल मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गजलकार रोहिदास पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे, तसेच जेष्ठ साहित्तिक, गजलकार इकबाल मुकादम, व्यंकटेश कुलकर्णी, सुधीर शेठ, मुज्जफर अ गफुर सय्यद, हे देखील उपस्थित राहून रसिक प्रेक्षकांना आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणार आहेत तसेच अनेक ठिकाणाहून कवी, लेखक, साहित्तीक, शिवव्याख्याते, समाजसेवक उपस्थित राहुन आपले अनमोल शब्दांचा, काव्यांचा भांडार आपल्या समोर सादर करणार आहेत. खास वैशिष्ठ म्हणजे या प्रकारे कार्यक्रम आपल्या म्हसळा शहरात प्रथमच होत असुन चाहत्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे म्हसळा टाईम्स कडुन सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आपल्या म्हसळा शहरातील कवी, साहितिक, लेखक, शिव व्याख्याते, सहभागी होणार आहेत त्यामुळे शहरातील या क्षेत्रातील प्रेमींना नवी पर्वणीच ठरू शकते तसेच याच कार्यक्रमात या क्षेत्रातील मान्यवरांचा फाऊंडेशन च्या वतीने गुणीजन पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप कारखानीस यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
आम्ही प्रथमच गजल ए मैफिल कार्यक्रम आयोजित करीत आहोत, ललित कला फाऊंडेशन व म्हसळा टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ होणार आहे. या मुळे आम्हाला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला आमचे सहकारी व पत्रकार संतोष उध्दरकर हे उत्तम सहकार्य करीत आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे, अतिशय सुंदर कार्यक्रम होणार आहे तसेच याच कार्यक्रमात काहींचा गुणीजन पुरस्काराने सन्मान देखील करण्यात येणार आहे.
दिलीप कारखानीस
अध्यक्ष.